तुझीच मी
तुझीच मी
किती करतेस प्रेम तू
असं का तू विचारतोस
अजूनही आवडतो ना मी
हा प्रश्न तुला का पडतो
तुझीच आहे वेड्या मी
तुझीच कायम राहील
क्षणिक आहे दुरावा हा
परतुनी तुझ्याकडेच येईल
तुझ्या प्रेमासाठी तर मी
सप्तसागर ही ओलांडले
सर्वकाही सोडून सख्या
तुझ्याजवळच तर आले
अट फक्त एकच माझी
तूच नेहमी सोबत हवा
दुनियेच्या या भीषण गर्दीत
हात कायम तू घट्ट धरावा

