तुझी सुमधूर वाणी....
तुझी सुमधूर वाणी....
मुग्ध झालो ऐकूनिया
तुझी सुमधूर वाणी ।
सांग सखे बनशील का गं
तू माझ्या दिलाची राणी ।।
एक-एक शब्द तुझे
आठवते मज जसेच्या तसे ।
सुंदर तुझा मुखडा हा गं
नित्यदिनी नयनी वसे ।।
झालो प्रेमवेडा खरा
तूच मज सर्वत्र दिसशी ।
स्वप्नामध्ये येऊनिया
मज बघताक्षणी तू हसशी ।।
नजरच हटेना तुझ्यावरून
जेंव्हा तू असते माझ्यासमोर ।
स्पर्श होताच तुझ्या देहाचा
थुईथुई नाचे मनातला मोर ।।
प्रेम आहे माझे तुजवर
आईशप्पथ खरं सांगतो ।
रोज माझ्या प्रार्थनेत गं
देवाला तुझी साथ मागतो ।।

