तुझी सोबत
तुझी सोबत
वेडीवाकडी वळणे येता
डगमगून न जावे माझे पाऊल
ऊन सावली झेलण्या
मला मिळावी तुझी सोबत
काटे टोचूनी रक्त येता
घाळाय न व्हावे काळीज
फुंकर घालूनी शांत कराया ह्रदयास
मला मिळावी तुझी सोबत
न जावा तोल संकट येता
आयुष्याचा प्रवास न वाटावा कठीण
सर कराया हा प्रवास अवघड
मला मिळावी तुझी सोबत
आयुष्य एक खेळ बनता
माझे मन ना बंद पडलेलं खेळणं व्हावं
चावी देत हे खेळणं सुरळीत ठेवाया
मला मिळावी तुझी सोबत...

