तुझी माझी पहिली भेट
तुझी माझी पहिली भेट
तुझी माझी पहिली भेट
होती काही क्षणांची
जुळली होती तेंव्हांच नाती
दोघांच्या मनाची
नजरेला माझ्या नजर देऊन
झुकली नजर ती विनयाची
तेंव्हा कळली माझ्या नजरेला
भाषा ग ती प्रणयाची
झुकलेली नजर उठली तुझी
साथ तिला पापण्यांची
नव्याने जाणवलेली मला
स्पंदने माझ्या ह्रुदयाची
नजर माझी नव्हती हटली
भुरळ तुझ्या सौंदर्याची
तुझी माझी पहिली भेट
होती काही क्षणांची
नव्याने ओळख झाली होती
डोळ्यांच्या त्या कमळांची
धडधड वाढली माझी बघुन
उघड झाप ती पाकळ्यांची
नजर तुझी सांगत होती
अनोखी भाषा ती प्रितीची
गरज नव्हती वाटली मला
जुन्या त्या प्रेमाच्या रितीची
श्वासांना ही झाली जाणीव
वेगळ्या त्या भावनांची
तुझी माझी पहिली भेट
होती काही क्षणांची
आठवणच नाही झाली मला
लिहुन आणलेल्या गाण्याची
गरजच नाही ग तुला तुझ्या
नजरेच्या तिरक्या बाणांची
नजर तुझी खुणवू लागली
वेळ झाली जाण्याची
नजर माझी शोधत होती
खात्री पुन्हा येण्याची
नजर माझी हटत नव्हती
ओढ तिला ग मिलनाची
तुझी माझी पहिली भेट
होती काही क्षणांची
जुळली होती तेव्हाच नाती
दोघांच्या मनाची

