STORYMIRROR

PRAMILA SARANKAR

Romance Others

3  

PRAMILA SARANKAR

Romance Others

तुझी जागा....

तुझी जागा....

1 min
352

तुझी जागा माझ्या हृदयाच्या कप्प्यात

मनातल्या मंदिरात

माझ्या अस्तित्वात.... 


तुझ्या जागेवर फक्त तुझाच हक्क आहे, 

मनात माझ्या तुझ्या आठवणींचा गाव वसला आहे.... 


मैत्रीच्या बंधनाचे 

बांधले आपण घर, 

तेव्हाच तुझं नाव कोरलं माझ्या स्पंदनात ह्रदयाच्या जागेवर.... 


तुझ्या आवाजाच्या जादूईने भूलवून मला टाकलं, 

तुझ्या सुरेल अशा स्वरांनी ह्रदयाच्या जागेवर नाव मग कोरलं..... 


तुझी जागा नेहमीच ह्रदयात अबाधित राहील, 

ऋणानुबंधाचे नाते आपले अजूनच गहिरे होईल... 


माझ्या ह्रदयात तुझी जागा आहे खूप खास, 

क्षणाक्षणाला तुझाच असतो माझ्या अवतीभवती वास,

तुझ्या आठवणींच्या सहवासाने मिळतो मला श्वास,

सतत तू जवळ असावीस अशी असते मनीची आस,

मग येता जाता होतो सखे तुझाच भास, तुझाच भास...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance