तुझे शब्द
तुझे शब्द
शब्द माझे सरत नाहीत
शब्द माझे झरत नाहीत
शब्द माझे गात नाहीत
शब्द माझे पहात नाहीत
शब्द माझे बोलत नाहीत
शब्द माझे ऐकत नाहीत
शब्द माझे दिसत नाहीत
शब्द माझे फसत नाहीत
शब्द माझे घावं देत नाहीत
शब्द माझे हाय घेत नाहीत
शब्दांना माझ्या स्पर्श होतो तुझा
शब्दांना माझ्या अर्थ लाभतो तुझा
आनंद मनाला देती शब्द तूझे
परतून आनंद घेती शब्द तूझे
नजरेत तुझ्या वाचतो शब्द तूझे
मनात तुझ्या पेरतो हे शब्द तूझे
मनात रुजतात ते शब्द तूझे
मनात फुलतात ते शब्द तूझे
मलाच आता ओळखतात शब्द तूझे
माझ्यातील तुलाच पूजतात शब्द तूझे
भय राहिले ना आता सोबत शब्द तुझे
भारून दिलेस विश्वप्रार्थनेत हे शब्द तुझे
शब्द माझे वाचावयास ही रात्र सरली
शब्द तुझे म्हणावयास शुभ प्रभात झाली
