तुज स्वप्नात रंगले
तुज स्वप्नात रंगले
भाव होते जे जे मनी
सारे नयनी साठले
आज बेधुंद होऊनी
तुज स्वप्नात रंगले //१//
कसे वेड अनामिक
वेड्या मनास लागले
नकळत माझ्या,सख्या
मन तुझ्यात गुंतले //२//
भेट सख्याची न होता
जीव बहु व्याकूळला
धीर देत मना, जीव
तुज स्वप्नात रंगला //३//
गोड गोड स्वप्नी कसा
प्रेमाचा रस्ता अनंत
हात येता तुझा हाती
हर्षाला नव्हता अंत //४//
प्रेमयुक्त नभांगणी
अन्य तारा झाल्या मंद
मेघ-मुक्त नभामध्ये
चमकतो प्रीतचंद्र//५//