STORYMIRROR

अरविंद कुलकर्णी

Classics

2  

अरविंद कुलकर्णी

Classics

तो आला

तो आला

1 min
291

वाट ज्याची पहात होते

निनादत तो आला

जीवाची या धांदल गडबड

तारांबळ उडवित आला......


पहिला पाऊस अंगावरती

रोमांच उठवित गेला

ओंजळीतल्या पागोळ्यांना

हृदयी साठवित गेला.......


नव्याजीवाला फुटतील धुमारे

रुजतील नव्या आशा

नवसृजनाचे वाहतील वारे

धुंद होतील दिशा.......



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics