STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

3  

Meenakshi Kilawat

Romance

तनू पल्लवीते कोमल काया

तनू पल्लवीते कोमल काया

1 min
152

या कोमल गालात 

खळी हासते

अवखळ ती माझी

जिव्हा बोलते

उल्हसते मनात तुमची माया 

दळवळ तनू पल्लवीते राया....


ओलेती न्हाऊन आले

बघा मी तुमची झाले

माथी कसे रूळावले

रेशमी केश कुंतले

केवड्याचा सुगंध 

भरला मंद

श्वासामध्ये फुले ही कोमल काया 

दळवळ तनू पल्लवीते राया....॥


स्वर आरवी कावळा

पाहून रूप सावळा

आलं कोण पाव्हणं

रूप आहे बावणं....

माडीवर आलंया

हा दिलबरा

उल्हसली माझी गांधारली काया

दळवळ तनू पल्लवीते राया....॥


उल्हसते या मनाला

सप्तरंगी तनू भेट 

दळवळ हा तनूला 

बहर देतोया थेट

देखणा सरदार

मर्द मराठा

तुमच्या प्रेमात यौवन खुलाया

दळवळ तनू पल्लवीते राया....॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance