ती वचने सारी
ती वचने सारी
ती वचने सारी ..मी अजून जपलेली ..
मनातून माझ्या कधी काढू न शकलेली ..
व्यर्थ होत्या भावना ,व्यर्थ होते बहाणे ..
कळलेच नाही मला ..माझेच फसणे ..
नको होते माझे तुझ्या आयुष्यात असणे ..
विनाकारणच असे वचनात बांधणे ..
दे झुगारून आताती सारी वचने ..
नको आता ही व्यर्थच नाती जपणे ..

