अवचित होता भेट तुझी
अवचित होता भेट तुझी
कोण आले, कोण गेले
उमगले नाही मला
ओळखीचा भास
मात्र काही तरळला ..
येणे जाणे जणू
भेटणे पुर्नजन्मीचे
नाते जोडणे नव्याने
वाटते हवेहवेसे..
अवचित होता भेट तुझी
न वाटे विलक्षण
सुखावती लोचन
प्रारब्धा ने होता मिलन ...

