STORYMIRROR

neeta mali

Others

3  

neeta mali

Others

कैफ माणुसकीचा

कैफ माणुसकीचा

1 min
166

जे न बोलायचे ते बोलली माणसं ...

शब्दा शब्दांतच माणसाने तोलली माणसं ..!


जे नाकारायचे तेच स्विकारू लागली माणसं ..

अहंकाराला मनोमनी जपू लागली माणसं ..!


जे न करायचे तेच करू लागली माणसं ..

नित्य व्यवहारी चुकू लागली माणसं ..!


दादागिरीविरुद्ध कुणी आवाज ना उठवू लागले ..

दादालाच सारे सलाम करू लागले .. !


नैतिकता आता विसरू लागली माणसं ..

अनैतिकतेतच वाटू लागले हायसं ..!


दोन वितीच्या पोटासाठी नाती सारी सरली ..

ज्याने त्याने हव्यासाने झोळी आपली भरली ..!


कैक माणसे जरी सभोवताली ...

तरी कैफ "माणुसकीचा " मनात नाही ..!


वाटते आता एकांताची संगत सुखाची ...

मीच माझी तोडली माणसं जिव्हाळ्याची ..!


Rate this content
Log in