STORYMIRROR

neeta mali

Others

3  

neeta mali

Others

आला श्रावण

आला श्रावण

1 min
111

सोनसळी कोवळे ऊन

पसरे धरती वरी ..

पानावरती दवबिंदू ते

भासे पाचू परी ..


सरसर येती रिमझीम धारा ..

खेळ उन पावसाचा सारा..

तरुतळी सडा फुलांचा

पाडीतसे उनाड वारा ..


हळदुल्या त्या चिमण्या 

दाणे ठिपण्या अंगणात येती ..

विहिरी काठच्या बाभळीवरी

घरट्यांची आरास करती ..


सणासणांची तोरणे

सजती दारावरी ..

आला आला श्रावण आला ..

अंगणी सजे सडा - रांगोळी


सहा ऋतुंचे सहा सोहळे

त्यात आगळा श्रावण हा ..

मनभावन हा ..

आला श्रावण हा ..


Rate this content
Log in