पापणकाठ
पापणकाठ
1 min
160
हितगुज करीत होती
दोन आसवे नेत्रांशी ..
थांबून पापणकाठी ....
समोर तुझ्या नाही
ओघळायचे गाली
हे बंधन होते त्यांसी ..
चोरावी नजर ती कितीदा ..
पाहताच तुला व्हायची
आसवांची दाटी ...
गहिवरलं अंतःकरण ..
उलगडायचं .....
आठवणींच्या गाठी ...
आठवतात अजूनही
त्या प्रेमळ भेटी ..
पण, आज अशी ही
काय वेळ आली ..
जवळ तू असूनही ..
भेटीची चोरी झाली ..
आसवांना गालावरूनी
ओघळायची बंदी आली ....
ओलेत्या पापणकाठी ..
झाली आसवांची दाटी ..
