पुन्हा नव्याने भेटशील
पुन्हा नव्याने भेटशील
बोलणं टाळतेस.
मौनचं पाळतेस ..
खरं सांग मला तू
असं का छळतेस ..
प्रेम केलं तुझ्यावर
हाच माझा गुन्हा ..
एवढ्याचसाठी का ..
छळतेस पुन्हा पुन्हा ...
विश्वासानं माझं
मन तुला वाहिलं ..
मनातलं सारं दुःख
तुझ्यासमोर गाईलं ...
वाटलं होतं शब्दांमागील
भावना समजून घेशील ...
कधीतरी माझं म्हणनं
तू खर मानशील ....
झाला असेल गुन्हा ...
माफ मला करशील ..
विसरून सारं पुन्हा
नव्याने मला भेटशील ...

