ती दूर वाटत होती
ती दूर वाटत होती
ओळख तशी फारशी नाही
तरी ती मला आवडत होती
नकळत तिच्या प्रेतात पडून
का? ती दूर वाटत होती...
सांगायचं तर होत खूप काही
पण हृदयात धडपड होती
लपूनछपून पाहूनसुद्धा
का? ती दूर वाटत होती...
तू किती सुंदर दिसते
ही गोष्ट सांगायची होती
डोळ्यालगत ती असताना
का? ती दूर वाटत होती...
प्रपोज करावं असं मनात
रुकरूक नेहमी काळजात होती
गुलाब हातात देताना तरी
का? ती दूर वाटत होती...
स्वप्नातली ती परी
रात चांदण्यात दिसत होती
तिच्यासवेत आनंदात उडताना
का? ती दूर वाटत होती...

