प्रेम
प्रेम
1 min
190
प्रेम कसे करावे?
मनापासून करावे,आपुलकीने करावे
समोरच्याला आवडेल अन
भावेल असे करावे...
प्रेम कोठे करावे?
स्वप्नात करावे, बागेत करावे
निसर्गरम्य फुलांच्या सानिध्यात
बहरून जावे असे करावे...
प्रेम कोणावर करावे?
आईवर करावे, बायकोवर करावे
जीवापाड प्रेम करणाऱ्या
जुन्या प्रेयसीवर करावे...
प्रेम का करावे?
मनाला बरं वाटण्यासाठी करावे
कोणाचे तरी जीवनाचे
साक्षीदार म्हणून करावे...
