प्रेमातली तू
प्रेमातली तू
समोर येता तू माझ्या
मन अधीर बधीर होई
सांगु कसे ग प्रिये तुला
पाहताच क्षणी भान जाई!!१!!
ह्या निळ्या भोर आकाशात
तू माझी चांदणी रात्र दिसे
चंद्र मि तूझा शोभती
मन माझ तुलाच पहात बसे!!२!!
गुलाबावानी चेहरा ग तूझा
अन गाली सुंदर ती खली
कस सांगू ग ह्या वेड्या मनाला
तूच माझी जीवनाची चाफेकली!!३!!
नेहमी वाटे असे मनाला
फक्त तूझीच वाट पहात बसाव
मिठीत घेऊन मि तुला
प्रिये तू रोज विसाव!!४!!
करेन मि तुझ्यासाठी
रोज सारे प्रयत्न
कारण तूच आहेस राणी
हे मज लाभलेल रत्न!!५!!

