*रंग प्रेमाचा*
*रंग प्रेमाचा*
तू नव्याने परतुनी गाणं
कोकीळ गात होता
पहाटेचा शहारी वारा
गाण्याला साथ देत होता!
मयुर आनंदी होऊनी
तुला पाहता नाचत होता
मेघांच्या सरीतून तुझा
चेहरा चिंब होता
तू आली होती म्हणूनी
नयनी अश्रू आनंदी होता
परत बोलवसं म्हणुनी
मनात हिंदोळा होता
शब्द ओठी तुझ्या
प्रेमाला नजर देत होता
मनात काहूर वाटे मज
तो दिवस शेवटचा तर नव्हता
तुझी प्रत्येक आठवण
शायरीत जपली आहे
राधे तुझं हे प्रेम
कृष्णाने लिहलं आहे

