STORYMIRROR

Milya Gavanang

Romance

3  

Milya Gavanang

Romance

सानुली झुळूक

सानुली झुळूक

1 min
254

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे

अलगुज कानात प्रेम सांगावे

विलक्षण बोलक्या डोळ्यांत पहावे

पाहताच क्षणी गुलाब मी द्यावे...


वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे

तुझ्या स्पंदनासवेत हृदयात मी यावे

हातात हात घेऊन स्वप्न मी जगावे

जाशील तिथे मी झुळूक बनून मी यावे...


वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे

तुझ्या केसांच्या बट्टान बरोबर मी खेळावे

तुझ्या श्वासामधून मी वाहत राहावे

जीवनभर तुझा जोडीदार म्हणून जगावे...


वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे

निसर्गरम्य परिसरात थंड झुळूक व्हावे

मोगऱ्याच्या सुगंधात वास होऊन रहावे

तुझ्या कोमल मऊ ओंजळीत निजावे...


वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे

माझ्यासाठी तू ही झुळूक व्हावे

तुझ्या साऱ्या आठवणींना साद घालावे

आणि एकमेकांस जीवनात झुळूक बनून राहावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance