तिला आठवताना
तिला आठवताना
रोज तिला आठवताना
कवितेची एक ओळ रडते
धुंदीच्या लहरीत ती मला
हळुवार दूर जाताना दिसते...
रोज तिला आठवताना
प्रेमपत्रांची होडी बनते
ओघळणाऱ्या अश्रूंच्या धारेत
ती पूर्णतः भिजलेली असते...
रोज तिला आठवताना
आता फुलताच कळी कोमळते
दवबिंदूच्या धुक्यात ती
स्वतःच फुलणं थांबते...
रोज तिला आठवताना
समुद्राची लाट शांत असते
सवय होती किनाऱ्याला
की, तिच्या स्पर्शाची उणीव भासते...
रोज तिला आठवताना
दिवसाची रात्र लवकर होते
चांदण्यांची साथ चंद्राला
तिची चमक अंधुक दिसते...

