STORYMIRROR

Savita Samant

Inspirational

3  

Savita Samant

Inspirational

तेजशलाका

तेजशलाका

1 min
182

बालवयात लग्न होऊन आली

उंबरठा ओलांडून चौकटीत

पुत्रनिधनाचे दु:ख नशिबी

अवघ्या चौदा वर्षे वयात||१||

     

झाला शोक तुला अनावर

दिला धीर सहचराने

निश्चय केला तेव्हांच

     तुझ्यातील आत्मविश्वासाने||२||


स्वदेशातील माता-भगिनींवर

येऊ नये ती कठीण वेळ

साता समुद्रापार जाऊन

कष्ट अन् खर्चाचा ताळमेळ||३||


घेऊन ही प्रेरणा तू

खर्ची घातलेस जीवन

आनंदीबाई जोशी यांना

  विनम्र अभिवादन||४||


महत्वाकांक्षेचे पंख

बुद्धीमत्तेचे तेज प्रखर

२१व्या वर्षी भारतातील

तू पहिली महिला डॉक्टर||५||


      तुझ्या कतृत्वाने केलेस

      तू स्वतःला सिद्ध

      दुर्दम्य तुझी इच्छाशक्ती

     अन् शिकण्याची जिद्द||६||


दिलास तडा अंधरुढींना

बुरसटलेल्या विचारांना

म्हणूनच आज आम्ही मुक्त

घेऊन आमच्या आकांक्षांना||७||


अपार कष्ट साहून

झिजली तुझी काया

तू आहेस तेजशलाका

तुझ्यावर अपार माया||८||


Rate this content
Log in

More marathi poem from Savita Samant

Similar marathi poem from Inspirational