ते दिवस
ते दिवस
आठवणींच्या रूळावर चालताना
आठवतात ते दिवस
आठवतात ते क्षण,आठवतात त्या आठवणी
आठवतात त्या कॉलेज च्या कट्यावरच्या गप्पा आणी गाणी
होस्टेल ची तर काय
दुनियाच वेगळी असायची
'यही बाते तो बादमे याद आयेगी'
म्हणून आठवणी गोळा करायची
आमची वेगळीच चळवळ असायची
मस्ती साठी तर आमची
जागरणाची तयारी असायची
पण परीक्षेच्या आधी
झोप मात्र खूप यायची
मेस च्या जेवणा पेक्षा
तर आपण छान बनवू शकतो
म्हणून आमचा वाढलेला कॉन्फिडन्स असो
किंवा एक्झाम हॉल मध्ये सर्व इकडे तिकडे
बघत असतांना मला मात्र सर्वच येत
म्हणून चेहर्यावरची स्माईल असो
सर्व लेक्चर करायचे
म्हणून कोणाचीही तयारी नसायची
पण बंक करण्यासाठी मात्र
एक वेगळीच एक्साइटमेंट असायची
चार वर्षांच्या ह्या दुनियेची
कहाणीच वेगळी आहे
परत सर्व जगण्याची
तयारी मात्र पूर्ण आहे
