आव्हानंचा लढा
आव्हानंचा लढा
सावित्रीनी विडा उचलला
स्त्री शिक्षणाचा
मी विडा उचलला
स्वतःला घडविण्याचा
घडवता घडवता पुढे चालतीये मी
तरीही सन्मानासाठी का झटतीये मी
न भिता न डगमगता
पुढे जायचये मला
आव्हाना तोंड देत
स्वतःला घडवायचये मला
कर्तृत्वाची जाण असूनही
समाज का पुसतो मला
समाजाला सांगायचये की
पुढे चालत राहायचये मला
