माय मराठी
माय मराठी
1 min
116
जन्मानंतर आई म्हणताना
जी आधार बनली ती मराठी
मुक्ताई ची ओवी आणी तुकारामांचा
अभंग वाचतांना ध्यानी आली ती मराठी
विविध शब्दांनी समृध्द,अलंकारनी सुंदर
आणी व्याकरणानी परिपूर्ण बनली ती मराठी
आधी बालभारती आणी आता
कादंबरी मधून समजली ती मराठी
पू ल देशपांडे नी व्यक्ती आणी वल्ली आणी
सावंतानी युगंधर,मृत्युंजय मधून शिकवली ती मराठी
अशी महाराष्ट्राची शान आणी
माझी मायबोली बनली ती मराठी
