STORYMIRROR

suraj suryawanshi

Romance

3  

suraj suryawanshi

Romance

सव्वा नऊची बस..

सव्वा नऊची बस..

1 min
341

बघ आठवतंय का ??

लाल पिवळ्या फितीची सव्वा नऊची बस..

एस.टिची थकलेली मरगळलेली शेवटची शीट आठवतेय??

जिथे गाणी ऐकत क्षणिक प्रवासाची सुरुवात करायचो तेही एकाच हेडफोन वर...

डाव्या गालावर पडणारी आकस्मित खळी मला नेहमी जाणीव करून द्यायची

तुझा बाप अतिरेकी असल्याची

कारण एवढा देखणा अणुबॉम्ब बनवणं म्हणजे खरतर खडतर कार्यच..

केसाला बोटाने कानामागे नेण्याची अदा मात्र खूप वेगळी आणि विलक्षणही

डोमकावळ्यांची गर्दी असायचीस पण झुगारून निरंतर बडबड अजून स्मरणात राहतेच ...

कॉलेजच्या कॅन्टीन ला सुद्धा फिकटी लालसर ओशाळालेल्या बाकावर कवी कॉफी ??

म्हणून जेव्हा विचारायचिस ना मान नकारार्थी डुलायची मात्र तोंडातुन आपसूक हो...

पण आता ती बस ही येत नाही...

मीही जात नाही तो भाग वेगळा

गुडघे थकलेत खूप आता

एकट्यानं एस.टिची ओढ घेताना मात्र पावलच हरवतात...

पुन्हा चुणूक तू नसल्याची मात्र जाणीव होते तू आसपास असल्याची

आता निघायला हवं मला बहुतेक ...

बस चुकली का ग माझी ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance