STORYMIRROR

suraj suryawanshi

Others

3  

suraj suryawanshi

Others

सावित्री माय

सावित्री माय

1 min
152

बसलो होतो कॉलेजच्या कट्ट्यावर

गुंतलं होत मन विचारांच्या गर्दीत

सहज बोललं आतून मन

नसती सावित्री माय तर काय झालं असत

आपल्या महाराष्ट्रीयन वादीत

अडकली होती सावी सनातनी विळखात

सोसलं शेण दगड दुःख पचवल चिमटीत

तरी जात श्रेय सावीच

सरस्वती मातेच्या परडीत

शाळा पहिली ठाकली पुणेरी भिडे वाडीत

संस्कृती बुडाली,धर्म बुडाला निघाले

सनातन छाती बडवीत...

तरीही न डगमगली सावी भीती न्हवती काळजात

सावित्री माय निघाली वादळ तुडवीत

गर्भवतीस आश्रय...शूद्रास देत आसरा

तू गेली समाजसेवा घडवीत

होऊन तू कवयित्री

गेली तू इचार पेरीत..

शूद्र अतिशूद्रा दुःख गेली तू निवारीत..

आज शिकल्या तुम्ही लेकिहो

आहे का सावित्री माय आठवणीत

फिरता कॉलेज करत डिग्री वकिलीचा तोरा मिरवीत

केला का कधी इचार

नसती सावित्री माय काय बसलो असतो करीत ?


Rate this content
Log in