STORYMIRROR

suraj suryawanshi

Romance

2  

suraj suryawanshi

Romance

आयुष्य अस सावरून घ्यावं

आयुष्य अस सावरून घ्यावं

1 min
49

आयुष्य असं सावरून घ्यावं!

जावं म्हणतो कधीतरी रंकाळ्या च्या तळ्यावर

आणि घ्यावा म्हणतो आठवणींनचा 

हळवार वारा शहारणाऱ्या अंगावर


टाकावे मग दोन्ही पाय

त्या निखळत्या तळ्यात

आणि आठवणींच्या सुखद चांदण्याना

चाळणीत पुन्हा चाळीत बसावं


राहतील काही दुःखद आसवं आठवणींची

त्या दोन आसवांना

गोगलगाय सारखं पाठीवर कासवानं

बि-हाड घेऊन जावं


आयुष्य असं सावरून घ्यावं

असच तळ्याकाठी सावरताना 

तीही तेथेच असावी


कर्णाच्या कर्ण कुंडलासारखं 

तिच्या कानातील डुल

लखलख चमकावी

आणि तिरपा कटाक्ष माझाही पडावा

त्या मुखपटलावर

आणि पकडली जावी तेव्हाच चोरी माझी


हृदयान धडकताना बेचिराख व्हावं

तिने पुन्हा सवरताना

खलिदार गालावर कमळ हास्य फुलावं

सुटकेचा निश्वास मीही टाकावा

तिने आयुष्य पुन्हा असच सावरून घ्यावं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance