STORYMIRROR

suraj suryawanshi

Others

3  

suraj suryawanshi

Others

जाच..

जाच..

1 min
217

अंधार उशाला घेऊन निजते रे दादल्या

परवा संशयाचा पत्थर माथ्यावर होता

अनोलख्यास बोलावे म्हणून का ??

खोच पडलेल्या रक्ताचा प्रतेक थेम्ब

सुवाशीनीच्या पदरात होता...

आसुडाचा व्रण सुद्धा पाठीवर

निमूट गिळण्याचा का हा घास होता

आसवांचे डोहाळे जरी फुटले

नयनास माझ्या

नयनास वांजूटा ठरवण्याचा हा काळ होता

घ्यावा जरी घोट नरढीस विहरीतून

सुस्ताल नागिणीचा डसण्याचा डंख वेगळा होता

अरे बुडणार तरी कशी रे मे त्यात ...?

माझ्या पोटी तुक्याचा अभंग होता

कधी संपणार हा भोग वनवासाचा

आज सीतेच्या कसोटीचा हा काळ होता

वेताळ उतरूनी आज पाठीवरून

तिरडीच्या शोधात होता

खूप भेदरलेत बाहू आज कविता लिहताना

आज प्रश्न उदरातून होता

कसा येऊ ग मी माय बाहेर

आपल्याच माणसांचा

तुला सरणावरच जाळण्याचा डाव होता...


Rate this content
Log in