STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Romance

3  

Trupti Thorat- Kalse

Romance

स्वप्नात मी रंगले

स्वप्नात मी रंगले

1 min
271

स्वप्नात मी रंगले

तुझ्यासवे जगण्यात

मी रे गुंतले

नखशिखांत तुझ्या

प्रीतीत मी बुडाले.

स्वप्नात मी रंगले

झाले असे काहीबाही

आता ना उरले

तुझ्याविन काही.

स्वप्नात मी रंगले

प्रेमात न्हाऊन निघाले

सख्या काय हे घडले

स्वतःलाचं आरशात

पाहुनी लाजले.

मोरपिसी स्वप्नात मी रंगले

ममत्वाने पाझरून गेले

पुन्हा एकदा मी लहान झाले

आपल्या जीवास वाढवू लागले.

तुझे-माझे असे आता

काही ना उरले

तू अन मी एकरूप झाले

सख्या तुझ्यासवे सुखी

संसाराच्या स्वप्नात मी रंगले.

उद्याचे रे कोणी पाहिले

आत्ताचे क्षण रे आपुले

नको आता अंतर कुठले

सख्या तुझ्या कवेत मी विसावले

गुलाबी स्वप्नात मी रंगले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance