स्वप्न
स्वप्न
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.2K
रडताना तू हसवलेस
मला बांधुनी नात्यात
डोळ्यात येता झोप
जगवलेस तू स्वप्नात
आपली नव्हती ओळख
आपलेच काही असायचे
भाव नसतानाही नात्यात
मन तुलाच शोधायचे
शब्दात तुझ्या माझ्या
ओळख जुनी वाटायची
नव्या तुझ्या ओळखीत
स्वप्नात तुला भेटायची
रात्र अजून संपली नाही
डोळ्यात आहे जागली
स्वप्नात घेऊन माझ्या
तुला आठवून झोपली