स्वप्न बघ
स्वप्न बघ
डोळे अंधळे होतील
ऐवढा आराम आहे बाबा
सिमेंटच्या घरामध्येच
खरी सोय आहे दादा
कोण तोडा झाड
कोण झोपडी बांधा
सरकार तर देतोय ना
घरकुल करून आता
टँक्टर लावतोय जमिनीवर
बैलगाडा पण मुक्त केला
बांध पण मोजून मारून कसला
दहा पित्याची शांती घालून हडपला
नौकरिवर मिळतो तसा
जनजागृती करून कुठं मिळतो
म्हणून गपगुमान बांधवरची तोड़
गायरानातली तर कोण विचारतो
काय गाडी काय बंगला
पदावर बसून हुकूम फेकला
रम्मीच्या डावात जोड मिळते
तशी कवा मिळावी तुमच्या हुकमाला
