STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Classics Inspirational

4  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Classics Inspirational

स्वावलंबन

स्वावलंबन

1 min
281

नाही लाज मला मित्रा,

तुझ्या बुट पाॅलीशची !

धन्यवाद तुझे दोस्ता,

संधी दिली कमाईची !!


काढ मनातून सख्या,

भीती वाया मी जाण्याची!

नको जाऊ घाबरून ,

नाही स्थिती कायमची !!


काम हलके नसते,

लाज का बाळगायची !

संधी धरून एकेक,

शिडी वर चढायची !!


हीच प्रथम पायरी ,

स्वतः कष्ट करण्याची!

काम करता करता ,

स्वावलंबी बनण्याची !!


मोठे मला होण्यासाठी,

कास हाती शिक्षणाची!

मोठी स्वप्ने, ध्येये माझी,

आकाशात झेपायची !!


आज करतो पाॅलीश,

उद्या होणार यशस्वी!

एके दिवशी ऐकाल,

तुम्ही कवने यशाची !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics