सुर संगीताचे
सुर संगीताचे
अजुनही आठवते
तेच रुप तुझे प्यारे
गोड सुर संगीताचे
कानी रेंगाळते न्यारे//१//
मनी दाट ओझे माझ्या
भाव नाही सांगीतले
तुझ्या प्रितीत रंगलो
नाही तू ही ओळखले//२//
सप्त सुरांची पुजीका
तुझे रुपही मोहक
सुर संगीताचे तुला
देई आनंद अनेक//३//
तुझे गोड गोड शब्द
आहे माझ्या साठवणी
काय सांगु तुला सखे
रडवीती आठवणी//४//
सुर संगीताचे तूझे
आज झाले जरी दूर
ऐकु येताच संगीत
जागे तिच हुरहूर//५//

