STORYMIRROR

Shobha Wagle

Classics Inspirational

3  

Shobha Wagle

Classics Inspirational

सुपर पॉवर

सुपर पॉवर

1 min
113

प्रत्येक घरातली गृहिणी म्हणजे

असते नेहमी एक सुपर पॉवर

आपले घर गृहस्थी साभांळणारी

गृहिणी असते घरी एकमेव पॉवर.

भल्या पहाटे सदा उठत असते

आवडी निवडी सर्वांच्या जपते

पाहूणचार सकलांचा ती करते

अन् हसमुख चेहरा स्वतःचा ठेवते.

सुपर पॉवर बाई असते ती नेहमी

घर - दार साभांळून करते नोकरी

घर आणि ऑफिसची कामे करते

सर्वांसाठी बनवत असते भाकरी.

नीटनेटकेपणा टापटीप घर दाराची

स्वास्थ घरातल्या सगळ्याचे जपायाचे

आवडी निवडी जपण्यास तत्पर असणे

दुर्लक्ष मात्र नेहमी करत असते स्वतःचे.

गृहिणी असते तेव्हाच घरपण घराला

गृहिणी शिवाय घराला शोभा नसते.

घरातल्यांनी लक्ष्मी समान तिला मानावे

तिचीही काळजी सर्वांनी घ्यायची असते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics