STORYMIRROR

Rahul Sontakke

Classics Fantasy Inspirational

3  

Rahul Sontakke

Classics Fantasy Inspirational

सुखी माणसाचा सदरा

सुखी माणसाचा सदरा

1 min
414

आहे त्यात सुखी राहणे 

सुखी माणसाचा हाच सदरा 

रूपाहून गंध दरवळतो 

म्हणून स्त्री घालते गजरा 


आनंद क्षणाचा 

सुखाची कोणती व्याख्या  

 परिपूर्ण सुखी असा 

जगी नाहीय अख्या 


दुःखच उरले नसते 

सुखाचा सदरा असता तर 

सुखात काय मजा 

दुःखच नसते तर 


कुठे कुठे शोधले सुख 

नाही सापडले मला 

आसवांना लागतात 

डोळ्यात दुःखाच्या कळा 


असेल माझ्यातच काही उणीव 

भरून काढतोय हे दिवस 

सुखाचा तर दुःखाचा 

गोंजरलेला असतो दिवस 

  

सुखासाठी वणवण फिरताना 

आकाशालाही गवसणी घालतो 

परिकथेतील हरवून 

सुखाचा गाव शोधतो 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics