सुख आयुष्याचे
सुख आयुष्याचे
मी पाहिले रात्रीस
एक सुंदर स्वप्न
डोळ्यात तिच्या चमक
अन् गळ्यात होते रत्न
मी छोट्याश्या झोपळीत राहणारा
अन् चटणी भाकर खाणारा
ती मोठ्या महालातील राजकुमारी
अन् साजुक तूप खाणारी
मला झोपळीत बघून तिनं विचारलं
सांग मला
छोट्याशा झोपळीत राहून
चटणी भाकर खाऊन
कसं तुझ्या चेहऱ्यावरचं हसणं
अन् मी महालात राहून
साजूक तूप खाऊन
आमचं रोजचंच रडगाणं
मलाही जगता येईल का?
तुझ्यासारखं सुखात जगणं
मी तिच्याकडे बघून म्हटलो
माणसाच्या तीनच गरजा
अन्न वस्त्र निवारं
यातच येतं आयुष्य सारं
झोप हवी असते
सुखात आयुष्य जगण्यासाठी
अन् काम करावं लागतं
गरजा पुर्ण करण्यासाठी
थकलेल्या भागलेल्या माणसाला
रात्री भांडायला वेळ मिळत नाही
अन् धन संपत्ती चोरी होईल
याची भीती आम्हाला लागत नाही
तुम्हाला याच भीती पोटी
शांत झोप मिळत नाही
अन् म्हणून तुम्हाला
आयुष्याचं सुख मिळत नाही
