प्रेमाचा बाजार
प्रेमाचा बाजार
प्रेम करतोस ना तिच्यावर मग कर जीवापाड,
नको करू तू समाजाचा विचार...
पण होकारासाठी तिच्यावर दवाब आणून,
नको ना करू तू प्रेमाचा बाजार...
तुझं एकतर्फी प्रेम तिच्यासमोर व्यक्त कर,
कदाचित मिळेल ही तुला नकार...
पण तिला आपल्या जीवाची धमकी देऊन,
नको ना करू तू प्रेमाचा बाजार.....
तुझ्या एकतर्फी प्रेमाला मिळालेला नकार,
तू हसत हसत कर स्वीकार.....
पण तिला चव्हाट्यावर बदनाम करून,
नको ना करू तू प्रेमाचा बाजार.....
तुला नकार का मिळाला कर याचा विचार,
आणि बदल तू स्वतःचे आचार.....
तिच्याकडून मिळालेल्या नकाराला दोष देऊन,
नको ना करू तू प्रेमाचा बाजार...
