STORYMIRROR

Anupama TawarRokade

Classics Fantasy

3  

Anupama TawarRokade

Classics Fantasy

स्त्रीयत्वाची कहाणी

स्त्रीयत्वाची कहाणी

1 min
200

गर्भात आईच्या माझा होतो पात

जन्मदाते माझे करतात हो घात

जन्म होण्या आधीच मरण क्षणात

कसा घेऊ जन्म मी या जगात?


आले जन्मास तरी पहारे हजार

नजरकैदेत सदा मी फिरणार

बोलणे, चालणे जग ठरवणार

मी रहावे कसे हे सारे सांगणार


धनाची पेटी कुजते तिजोरीत

पडते बाहेर मी लक्ष्मी बंदिस्त

शोभा मी घराची ठेवा देव्हाऱ्यात

काय अर्थ आहे माझ्या जगण्यात


घर सांभाळूनही काही केले नाही आयष्यभर

देवून मुलांना संस्कार कोणावर केले उपकार

केली नोकरी तर साऱ्यांमुळे हे साकार

या साऱ्यांसाठी मानावे सदा सर्वांचे आभार


मेल्यावर तिरडीवर मज सजवले जाते

माहेरची साडी अन् सासरचे नाते

सरणावरही मी माझे स्त्रीयत्व जपते

तेव्हा सारे जग मजला पाहून हरखते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics