सर पावसाची
सर पावसाची
बरसुनी आली मेघ धार ही,
हर्षूनी गेली धरणी सारी...
बहरुनी येता पिके तान्हुली,
नटली ही सृष्टी, जणू स्वर्ग पहिली !
पाझरतात अमृताचे थेंब जणू,
नभात दाटलेल्या सागरतुनी...
देतात नवसंजीवनी जगण्यास या,
थकल्या - भागलेल्या माणसासही !
ओझरता ना हे थेंब आकाशीचे,
सांगुनी जातात मजला काही...
भेटू पुन्हा आपण अशाच सांज समयी,
कवी मनाच्या आरशातूनी !!

