मोगरा फुलला
मोगरा फुलला
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
177
मोगरा फुलला
अंगणी सुगंध
गुलाब बघुन
तुझ्यात बेधुंद (1)
वा-याची झुळुक
तुझाच इशारा
श्रावण सरीचा
अंगी रे शहारा (2)
नजर मिळता
झुकली नजर
गालावर लाली
मनात गजर (3)
मनात लाजले
गुलाबी रे गाल
खुलुन दिसती
मोग-यात बाल (4)
नजरेची भाषा
तुला रे कळली
पहिल्या भेटीत
मन ही मिळली (5)
हातात गुलाब
स्वागत निशाणी
काळीज तुझच
झाल होत पाणी (6)
गुलाबा सारखा
प्रेमाचा ग रंग
काट्यावर फुले
होईल अभंग (7)