हो आरूढ
हो आरूढ
सरूनी जाईल अंधार निराशेच्या धुक्यांचा,
येईल तव प्रकाश नव्या स्वप्नांचा !
चल हो तय्यार आता, होण्या स्वार निच्छयाच्या पंखांवरती,
घे भरारी अशी, आरूढ हो गगणावरती !!
कर स्वतःवर विश्वास वेड्या, येऊदे बळ तुज हातांभोवती,
वाहुदे रक्त धमण्यांमधे असे, जणू धगधगता ज्वाला येई वरती !
आता शांत बसणे नाही, अविरत परिश्रम हीच शांती,
कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती !!
मृत्यू हीच विश्रांती !!
