STORYMIRROR

Nanda Kokate

Romance

3  

Nanda Kokate

Romance

पारावरची प्रीत

पारावरची प्रीत

1 min
184

आयुष्याच्या संध्याकाळी

आठवतेस तू कातरवेळी

तोच पार अन् तीच आगाशी

तेच स्वप्न गं अजुनी उराशी ।


आठवते मज…

...येता-जाता मी तुला पाहसी

तूच माझिया ह्रदयात वससी

अबोल भावना मनी उमलती

नकळत तुझ्यावर जडली प्रीती ।।


प्रतिसाद तुझा मज खुलवून गेला

हाती हात घेता जीव बावरला

आणा-भाका दिल्या घेतल्या

देवू साथ निरंतर एकमेकाला ।


अजुनी मज स्मरती त्याा गाठीभेटी

चांदराती एकांती तळ्याकाठी

स्पर्श होता ओठांचा ओठी

धुंद होऊनी तू मज बिलगती ।


पण अडसर ठरल्या 

जाती-पातीच्या भिंती

घाव घातले ह्रदयावर

या दुष्ट चालीरीती ।


दूर लोटले तुज-मज 

ही कोती नाती-गोती

वादळ उठले, काही नुरले 

तुझ्या नि माझ्या हाती ।


जगलो कसा मी तुझ्याविना 

घेऊन ओंजळ रिती

दिनरात मनी ध्यास तुझा 

व्हावीस जन्माची सोबती ।


विसरता विसरेना मी पहिली प्रीत

आजही तुझ्या स्मरणात झुरतो नित ।

आशेवर मी, कधी काही घडेल अवचित 

अन् पुन्हा एकदा तुझी नि माझी होईल भेट ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance