STORYMIRROR

Sandip Pawar

Romance

3  

Sandip Pawar

Romance

तुला भेटल्यावर....

तुला भेटल्यावर....

1 min
190

मनात प्रश्न उभा राहतो, तुला भेटल्यावर 

त्याचे उत्तर ही मिळते ,तुला भेटल्यावर 

ओठात ओठ एकरूप व्हावे,तुला भेटल्यावर 

दूर व्हावा हा मनाचा दुरावा, तुला भेटल्यावर

रोजचे तुझे ते भेटणे पुन्हा जागे व्हावे, तुला भेटल्यावर

तुझे ते गुपित येणे परत व्हावे, तुला भेटल्यावर

तुझे ते रूषणे सहज हसणे व्हावे ,तुला भेटल्यावर

जवळ येताच पुन्हा तुझे ते हसणे फुलावे,तुला भेटल्यावर

रात्रीच्या त्या एकांतात मनसोक्त रुषणे, तुला भेटल्यावर

त्या मधुर रात्रितील स्वर पुन्हा जुळावे, तुला भेटल्यावर

एकांताच्या हिंदोळ्यावर बसणे व्हावे, तुला भेटल्यावर

मधुर वाऱ्याच्या तरंगात रंगून जावे, तुला भेटल्यावर

नकोत आता कसले अंतर, तुला भेटल्यावर

आता पुन्हा प्रेमात पडावे मी, तुला भेटल्यावर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance