दिवाळीची पहाट
दिवाळीची पहाट
1 min
168
दिवाळीची पहाट ही आनंद घेवून आली
आनंदाच्या हिंदोळ्यावर सोबत देवून गेली
दुःख , दारिद्र्य सारे दूर सारून गेली
सुखाच्या वाटेवर गुलाब पेरून गेली
गोडवा नात्यांचा मधुर करून गेली
बहीण - भावाच प्रेम घट्ट करून गेली
चुकलेली पाऊले पुन्हा घरच्या दारी आली
एकोप्याची चादर मना मनात देवून गेली
स्वर्गाचे सुख चादण्या रात्रीत देवून गेली
पौर्णिमेचा चंद्र गालावर देवून गेली
होती एक प्रेमाची अन् आपुलकीची वाट
त्या वाटेवर गोडवा ठेवून गेली
