प्रेमकविता आणि समीक्षा
प्रेमकविता आणि समीक्षा
प्रेम कवितांची
समीक्षा
प्रुफ रिडींग
आणि शब्दांची शहानिशा करावी
जागं असताना,
दिवसा ढवळ्या...
मध्यरात्री मात्र
त्या कवितेच्या
दारात लावायचं असतं
जीवाचं तोरण..
मखमली शब्दांच्या शय्येवर
सजवायचा असतो
धुंद प्रणय..
आणि पहाटे पहाटे बांधायची असते मिठी..
मुक्तछंदात..
मोहक...
मोहक..

