निरोप
निरोप
आठवणींचं रान फुलवायला
भेटींचा शिडकावा येत राहतो
मूळ रुजत राहतं
पान फुलत राहतं..
माझ्या मनात मुक्कामी असलेलं
तुझं मन
क्षणोक्षणी खुलत राहतं
प्रचंड वाट पाहून आलेला
त्या दिवशीचा शिडकावा सरतो
तेव्हा..
तेव्हा..
रान सैरभैर होतं..
डोळ्यांसमोर सतत तरळत राहतो.
भेटीआधीचे अधीर.
भेटीनंतरचे तृप्त..
निरोपावेळचे खोल..
आपण...
मन दुःखी होणारच असतं
इतक्यात एक वेल दिसते..
एक?
नाही.. दोन वेलींनी गुंतून भासणारी एक वेल..
तेव्हा रान पुन्हा तयार होऊ लागतं
पुढच्या ऋतूसाठी
पुढच्या सरींसाठी..
पुढच्या भेटीसाठी...
श्वासांच्या मातीत
रुजवून
आपण..
आपण..
एक आपण..

