स्पर्श
स्पर्श
नाजूक तुझ्या पायामध्ये
बघ स्तब्ध ही परात गं
गपचूप बसलीया
ओतवनि जरी गरम गं
मायेची उब किती
त्यात निजले हे भाकरीचे पीठ गं
त्याने निपचिप सोसले
भाजलेले सारे अंग गं
स्पर्श तुझ्या हाताचा म्हणुनी
नरम झाले पीठ गं
आपचुकच होतो आकार त्याचा गोल गं
पिटात त्या भरले तुझ्या मायेचा गंध गं
मायेच्या तुझ्या ओलाव्याने
भाकरी टूम फुगली गं
बघ तुझ्या प्रेमाने भाकरीला
गोडी किती छान गं
