STORYMIRROR

Vrushali Khadye

Fantasy

3  

Vrushali Khadye

Fantasy

स्पर्श

स्पर्श

1 min
170

त्वचेने होई ज्ञान स्पर्शाचे 

ज्ञानेंद्रिय किती कमालीचे!


स्पर्शा-स्पर्शातील गूढ अर्थ

समजला तर जीवन सार्थ!


लेकरास स्पर्श माऊलीचा

आनंद हा साऱ्या विश्वाचा 


यौवनातील स्पर्श बावरा

मना करी कावराबावरा


वासनांध नजरेचा स्पर्श

जीवनातील घालवी हर्ष


जलाचा स्पर्श वसुंधरेला

नवचैतन्य देई सृष्टीला


स्पर्श नाना रंगी,नाना ढंगी

फुलपाखरापंखी रंगीबेरंगी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy