सोपं आहे ..
सोपं आहे ..
सोपं आहे सगळं
फक्त मनात इच्छा पाहिजे..
इच्छा पूर्ण करण्याची
मनात तळमळ पाहिजे.....
सोपं आहे सगळं
फक्त जिद्द पाहिजे..
जिद्दीने कष्ट करण्याची
मनाची तयारी पाहिजे.....
सोपं आहे सगळं
फक्त आत्मविश्वास पाहिजे..
ठरवलेल काम पूर्ण करण्याचा
मनात निर्धार पाहिजे....
सोपं आहे सगळं
फक्त सातत्य पाहिजे..
चिकाटीने स्वप्न पूर्ण करण्याचा
मनात हट्ट पाहिजे.....
सोपं आहे सगळं
फक्त कष्ट करण्याची तयारी पाहिजे..
यश नक्की भेटणारच
फक्त मनात विश्वास पाहिजे.....
